Faijpur

फैजपूर येथील प्रांत अधिकारी यांना नाभिक समाजा ने दिला आंदोलनाचा इशारा

फैजपूर येथील प्रांत अधिकारी यांना नाभिक समाजा ने दिला आंदोलनाचा इशारा

सलीम पिंजारी

फैजपुर चे प्रांत अधिकारी यांना नाभिक समाजाने दिला आंदोलनाचा इशारा
दि. २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन मुळे बंद असलेल्या नाभिकांचा सलून व्यवसाय ठप्प असल्याने सम स्त राज्यातील सलून व्यवसायिकांची उपासमार होत आहे, अश्या परिस्थितीत सुद्धा शासनाने दिलेल्या आदेशानुसार नाभिकांनी आपला सलून व्यवसाय अगदी तंतोतंत बंद ठेवला आहे, या संदर्भात या अगोदर दि. १७ एप्रिल २०२० रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे संरक्षण कीट व शासकीय मदतीची मागणी असलेले निवेदन देण्यात आले परंतु अद्यापपावेतो या संदर्भात प्रशासनाकडून कुठलेही ठोस पाउल उचलले गेले नाही, म्हणून दि. ०५ जून २०२० रोजी पुन्हा व्यवसायिकास मदत व संरक्षण मिळावे याबाबत नाभिक समाजाच्या वतीने सोशल डीस्टसिंग चा वापर करत पुन:श्च स्मरणपत्र ( निवेदन ) उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी फैजपूर यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात तामिळनाडू, दिल्ली सारख्या इतर राज्यांनी सलून व्यवसायाच्या अडचणी समजून घेऊन ज्या प्रमाणे नियमावली घालून व्यवसाय करण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे आम्हाला सुध्धा परवानगी मिळावी किंवा दरमहा १० हजार रु. मासिक अशी आर्थिक मिळावी अशी मागणी करण्यात आली. सलून व्यवसायिकांचा प्रश्न तातडीने न लावल्यास दि. ०८ जून २०२० पासून लोकशाहीच्या मानवी मुल्यांच्या अधिकारानुसार आम्ही कुठल्याही आंदोलनाची भूमिका घेवू, या आंदोलनामुळे काही परिणाम उद्भवल् ास सर्व तोपरी शासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी फैजपूर नाभिक समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, जिल्हा संघटक किशोर श्रीखंडे, तालुका प्रतिनिधी प्रवीण हातकर, प्रमोद जगताप, छोटू सनंसे व परिसरातील नाभिक सलून व्यवसायिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button