Kolhapur

‘मला अटक केली तरी चालेल, पण…’ ; शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज

‘मला अटक केली तरी चालेल, पण…’ ; शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज
कोल्हापुर प्रतिनिधि:अनिल पाटील :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. विधानसभा प्रचरासाठी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी आज पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

‘हे सरकार सीबीआय, ईडी, पोलीस यांच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत आहे. पण आम्ही कशाला घाबरत नाही. गुन्हे दाखल करा नाहीतर अटक करा, पण शेतकरी, कामगार, युवक यांच्या प्रश्नांवर आपण बोलत राहू,’ असं म्हणत शरद पवार यांनी सरकारला आव्हान दिलं. निवडणुकीच्या निमित्ताने या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम जनतेने करावं, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

सरकारने मागील 5 वर्षात सर्वसामान्य माणसाचे हित जपले नाही, त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. भाजपा आणि सेनेला शेतीतले काही कळत नाही. कांद्याची वाईट अवस्था आहे. सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना सरकारने निर्यात बंदी केली हे सरकारचे शेतकाऱ्यांवरील प्रेम,’ असा टोला लगावत शरद पवार यांनी शेतकरी प्रश्नावरून सरकारला लक्ष्य केलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button