Amalner

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा च्या तालुकाध्यक्षा पदाची माळ सामाजिक कार्यकर्ते नाविद शेख यांच्या गळ्यात.

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा च्या तालुका अध्यक्षा ची माळ सामाजिक कार्यकर्ते नाविद शेख यांच्या गळ्यात.

अमळनेर रजनीकांत पाटील

अमळनेर येथिल मुस्लिम समाजातील धडाडीचे तरुण सामाजिक कार्यकर्ते नाविद शेख यांनी राष्ट्रव्यापी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या संघटनेच्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे.

अमळनेर येथे धनदाई कला महाविद्यालयात राष्ट्रीय मुस्लिम मोर्च्यांची तालुका स्तरीय बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अजहरी यांच्या आदेशानुसार जळगांव जिल्हाध्यक्ष डॉ शाकिर शेख यांच्या द्वारे अमळनेर येथिल सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्याची ख्याती आहे असे धडाडीचे कार्यकर्ते नाविद शेख यांना नियुक्ती पत्र देऊन तालुका अध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नाविद शेख याची अमळनेर तालुक्यात एक उत्तम सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. मुस्लिम बांधवांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ते अग्रेसर असल्याने लोकप्रिय आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात धर्म आड नयेवु देता मुस्लिम तरुणांना सोबतीला घेऊन कोरोना मृत रुग्णांना त्यांच्या धर्मानुसार अंतिम विधी करण्याचे काम सातत्याने करीत आहे. त्यांच्या या नियुक्तीला सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button