यवतमाळ
दोन वेळा नेशनल अवार्ड मिळवणारे बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील मा.प्रा.डॉ. हरिदास धुर्वे यांना अखिल भारतीय प्रतिभा संमेलन- 2019 डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन दिल्ली, शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट समजणारा ‘राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार ‘ दि. 15 सप्टेंबरला आंध्रा भवन, दिल्ली येथे राज्यपाल(मिझोरम) मा. अमलोक रतन कोहली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी मंच वर मा. रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. संजय धोत्रे केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री मा. ज्ञानेश्वर मुळे सदस्य मानवाधिकार आयोग भारत सरकार उपस्थित होते.
मा.प्रा.डॉ. हरिदास धुर्वे हे उत्कृष्ट वक्ते असून ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे उपाध्यक्ष , आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ चे संचालक, कोया पुनेम गोटुल समिती यवतमाळ चे आजीवन सदस्य असुन अनेक शैक्षणिक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहेत.
आदिवासी समाजातील उच्च शिक्षीत मा.प्रा.डॉ. हरिदास धुर्वे समाजासाठी प्रेरणा दायक आहे.
सर्वत्र आदिवासी समाजाकडून त्यांचे कौतुक होत आहे.







