राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी
राजेश सोनुने
कोल्हापूर : दि. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान तर्फे संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महालक्ष्मी मंदिर जवळील त्यांच्या पुतळ्यास लहुजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अक्षय साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अक्षय साळवे म्हणाले की, संत गाडगे महाराजांनी बाह्य स्वच्छतेबरोबरच मानवी मेंदू, मनाची स्वच्छता आपल्या प्रबोधनात्मक अभंगातून केली असल्याचे सांगितले.
यावेळी परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सामाजिक,राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अण्णाप्पा खमलेहट्टी, राज कुरणे, राजेश साळवी, रोहित साळवी, शरद कांबळे आदी विविध पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते






