अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात कोरोना योद्धा म्हणून नंदुरबार येथे सन्मान
रजनीकांत पाटील अमळनेर
अमळनेर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात कोरोना योद्धा म्हणून नंदुरबार येथे सन्मान. सावित्रीबाई फुले जयंती आणि राजमाता जिजाऊ जन्मदिनाचे औचित्य साधून याहा मोगी मंदिर परिसर नवापूर चौफुली नंदुबार येथे नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात नुकताच राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली. मेळाव्यात कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि सुभराऊ फांऊंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धाचे प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. अत्यंत अतिदुर्गम भागात कोरोनाच्या काळातही नर्मदा नदीत नाव चालवत आणि आठ किलमीटर पायी प्रवास करत अंगणवाडीच्या लाभार्थीना सेवा देणाऱ्या चीमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेलू रमेश वसावे आणि त्यांचे पती यांचा विशेष गौरव करण्यात आला.अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी कर्मचाऱ्यानी शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा मिळविण्यासह अन्य प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी संघटनेची ताकद वाढवून संघटित लढा उभारणे गरजेचे आहे.असे मार्गदर्शन करताना मायाताई परमेश्वर सांगितले. कोरोनाच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना मुक्तिसाठी दिलेले योगदान प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात येत असल्याचे सुभराऊ फांऊंडेशन अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी बोलतांना सांगितले. सदर मेळाव्यात उपाध्यक्ष अँड.गजानन थळे(मुंबई), कार्याध्यक्ष युवराज बैसाणे (धुळे) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सुधीर परमेश्वर यांनी सुत्रसंचालन केले.तर अमोल बैसाणे यांनी आभाप्रदर्शन केले.






