Amalner

शासनाच्या स्वाध्याय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्तीला वाव केंद्रप्रमुख अरुण मोरे..

शासनाच्या स्वाध्याय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्तीला वाव केंद्रप्रमुख अरुण मोरे..

अमळनेर

अमळनेर : शासनाच्या स्वाध्याय उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या विचारावा मिळत असून विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झालेली आहे विषयाची भीती निर्माण कमी होऊन विद्यार्थी अभ्यास करु लागले आहेत सध्या स्वाध्याय उपक्रमात जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. यासाठी शासनाचे अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक विद्यार्थी ,पालक यांचे योगदान मोठे आहे असे देवगाव देवळी येथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये स्वाध्याय बद्दल
विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना मार्गदर्शन करताना गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख अरुण मोरे मार्गदर्शन करताना बोलत होते
व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन होते.केद्रप्रमुख मोरे यांनी शाळेला भेट दिली असता शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय व परीक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत शाळेतील स्वाध्याय उपक्रमातील विद्यार्थी सहभाग व शाळेतील उपक्रमाबद्दल अभिनंदन करीत शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्वाध्याय उपक्रमात सहभागी करावे असे गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख अरूण मोरे यांनी सांगितले.मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले. तर यावेळी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button