Parola

पारोळ्यात पोलीस प्रशासनाकडून टवाळखोरांना दिला चोप

पारोळ्यात पोलीस प्रशासनाकडून टवाळखोरांना दिला चोप

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

येथील शहरात आज संचार बंदीचा तिसरा दिवस असून बंदीच्या काळात असंख्य नागरिक कारण नसताना शहरात संचारबंदी उल्लंघन करत फिरतांना दिसत आहे.
यासंदर्भात वृत्त असे की मागील दोन महिन्यांपासून करोना या घातक विषाणू आजारामुळे अनेक नागरिकांचे बळी गेले असून या करोना विषाणू च्या अत्यंत घातक आजाराचे प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात जमावबंदीचा आदेश लागू केले असून पारोळा शहरात व तालुक्यात जमावबंदी च्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात विनाकारण नागरिक बिनधास्त फिरत असताना दिसून येत आहे.

म्हणून पारोळा चे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे व उपनिरीक्षक बागुल साहेब व दातीर साहेब व पारोळा नगरपालिकेचे अधिकारी मुंडे साहेब व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांनी व त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांसह शहरात आज सकाळी, दुपारी व सायंकाळी गस्त घालून जमावबंदीचा आदेशाचे पालन न करणारे व कुठलेही काम नसताना फिरणाऱ्यांना चांगला चोप दिला आज सकाळपासूनच पोलीस निरीक्षक लीलाधर कानाडे साहेब हे आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह यांनी शहरातील महाराणा प्रताप चौक ते नगरपालिका व भाजी मंडी, कजगाव नाका, एक नंबर शाळा, भवानी चौक, राम चौक शनि मंदिर चौक, मोठा महादेव चौक, टेलिफोन अक्सचेंज नाका गाव होळी चौक, बस स्थानक परिसर या परिसरात गस्त घालून विनाकारण दुचाकी वाहने घेऊन बाहेर फिरणाऱ्याना चांगला चोप दिला व जमाबंदी काळात नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी बाहेर घराबाहेर निघू नये असे आवहान पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button