Amalner

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची गद्दारी…तनसे बीजेपी के साथ मनसे राष्ट्रवादी के…कोणी केला घात…

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची गद्दारी…तनसे बीजेपी के साथ मनसे राष्ट्रवादी के…कोणी केला घात…

अमळनेर
अमळनेर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनिल भाईदास पाटील यांचा 8594 मतांनी विजय झाला.माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिरिषदादा चौधरी यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत बदलीचा फटका शिरीष दादा चौधरी यांना बसला आहे. काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षात आलेल्या ललिता पाटील यांचाही फारसा प्रभाव पडला नाही. यातून त्यांचे राजकीय वजन देखील लक्षात आले आहे. या निवडणुकीत बऱ्याच राजकीय नेत्यांचे राजकीय वर्चस्व आणि प्रभाव या बद्दल सामान्य जनतेला समजला आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पक्षाच्या दबावात बिजेपीचे तिकीट मिळालेल्या शिरिषदादा चौधरी यांच्या सोबत तर होते परंतु त्यांची निष्ठा मात्र बीजेपी ला देऊ शकले नाही. आतून बंडाळी करत त्यांनी मनसे अनिल पाटील यांना साथ दिली तर वाघांनी आपले फारसे स्वारस्य न दाखविता दूर राहून तिकीट कापल्याचा बदला घेतला.
भूमी पुत्र विरुद्ध विकास पुत्र असा सामना असलेल्या या लढाईत भूमी पुत्राचा विजय झाला आहे. परंतु विकास पुत्राला हरविण्यासाठी तारे वरची कसरत करावी लागली आहे. सर्व घटक मिळून विकास पुत्र यांना हरविण्यासाठी साम, दंड ,भेद, इ नितींचा उपयोग केला.या खेळी ला चौधरी बंधू बळी पडले असून राजकीय कट कारस्थान मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले गेले.

कोणी केला घात

??शिरिषदादा चौधरी यांचा अति आत्मविश्वास

??सर्वांवर ठेवला विश्वास

??अंतर्गत बंडाळीची शक्यता असूनही दिले नाही लक्ष

??ज्यांना त्यांनी जवळ केल त्यांनीच खुपसला

खंजीर

??गिरीश महाजन यांची पूर्व नियोजित खेळी

??वाघांचा पलटवार

??जनतेचा कौल समजून घेण्यात झाली चूक

??अनिल पाटील यांनी भावनिक व सहानुभूती

चा मार्ग अवलंबिला

??ज्यांनी “बिका” नेर म्हणून तालुक्याची ओळख निर्माण केली त्यांनीच घेतला पुढाकार

शहरी भागात माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांना चांगला प्रतिसाद होता परंतु तालुक्यातील ग्रामीण भागातुन मात्र अनिल पाटील यांना अधिक मते मिळाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button