Amalner

अमळनेरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक कार्यकर्त्या कडून भावपूर्ण अभिवादन.

अमळनेरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक कार्यकर्त्या कडून भावपूर्ण अभिवादन

अमळनेर येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यास असंख्य आंबेडकरी जनते कडून सहअश्रु नयनाये भावपुर्ण अभिवादन करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की, शहरातील गांधलीपुरा भागातील पुर्णकृती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नियमित वेळेस सकाळी ८.३० वा बौधाचार्य ज्ञानेश्वर निकम, सिद्धार्थ सोनवणे यांनी वंदना घेतली. तद्नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारतीय बौद्ध महासभा, पंचशील युवक मंडळ, सिद्धार्थ व्यायाम शाळा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ,समता कला मंच ,आदिवासी एकता संघर्ष समिती यासह अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी आपल्या सहअश्रु नयनाने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी नगरसेवक नरेंद्र संदाणशिव, सामाजिक कार्यकर्ते सोमचंद संदाणशिव, फयाज पठाण, प्रा डॉ राहुल निकम, पोसनि नरसिंह वाघ, प्रा गुलाले, अर्जुन संदाणशिव, किरण बहारे, नगरसेवक हाजी शेखा मिस्टरी, नाविद शेख, वनपाल प्रदीप रामराजे, अजय भामरे, प्रा जयश्री दाभाडे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, संजय मरसाळे, सबगव्हांचे सरपंच नरेंद्र पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, युवराज चौव्हाण,अरविंद कदम, हृदयनाथ मोरे,अनिल बनसोडे, रमेश वानखेडे,ज्ञानेश्वर संदाणशिव, विजय गाढे, संजय बिर्हाडे, मनीष संदानशिव, संजय संदानशिव, राहुल सदांनशीव, गोपीचंद चव्हाण, रमेश झालटे, चंद्रकिर्ती संदानशिव, राजेंद्र वानखेडे, योगेश बिऱ्हाडे, नितीन संदानशिव, प्रा डॉ विजय तूंटे, विजय सदांनशीव, दिनेश बिऱ्हाडे, गौरव सोनवणे, प्रमोद बिऱ्हाडे,आकाश साळवे, भूषण शिरसाट, भारती मोहिते, दिपक मोहिते, संदिप शिरसाट, सिद्धार्थ सपकाळे आदी सह असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.चौकटीतपरमपूज्य, महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मूर्तीस अभिवादन करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेने दिलेल्या वेळेचा राजकीय व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विसर पडल्याने समस्त आंबेडकरी जनते कडून जाहीर निषेध व्यक्त केला. विशेष बाब म्हणजे यापूर्वी स्वर्गीय दलित नेते रामभाऊ संदानशिव हयात असतांना दरवर्षी प्रमाणे ठरलेल्या वेळेत तालुक्यातील सर्व राजकीय व शासकीय अधिकारी उपस्थित राहत होते.निषेधाची पोस्ट सोशियल ग्रुपवर व्हायरल होताच लोकप्रतिनिधी सह शासकीय अधिकारी लगबगीने पुतळ्यास अभिवादन करण्यास येतांना दिसले. मात्र आंबेडकरी जनतेत नाराजी व्यक्त होतांना दिसत होती.अमळनेर न पा चे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे साफसफाई करण्याकडे पुर्णतः दुर्लक्ष केल्याने समाजात असंतोष निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाला आहे. ५ डिसेंबर च्या रात्री ९.०० वाजेच्या दरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पाण्याने धुऊन परीसर स्वच्छ केले. विशेष बाब म्हणजे सदर स्मारक हे न पा प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रात येत असुन ही साफसफाई कडे दुर्लक्ष करण्यात आले ,अशी भावना डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र सदांनशीव यांनी देशोन्नतीशी बोलतांना व्यक्त केली. शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकाची नियमित पणे साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button