?️ Big Breaking…अमळनेर येथे पुन्हा एका आरोपीचा खून….
नूरखान
अमळनेर तालुक्यातील कुर्हे खुर्द येथील आरोपी रविंद्र अजबसिंग पाटील याचा लोकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कुर्हे येथे 15 दिवसांपूर्वी सुरत येथून आलेला रवींद्र हा सराईत गुन्हेगार होता.त्याच प्रमाणे थोडा मानसिक रित्या अस्वस्थ असल्याचेही माहिती मिळाली आहे. त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत.वयाच्या 16 वर्षी त्याने पहिला गुन्हा केला होता तर आज मृत्यू समयी त्याचे वय 48 होते.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी त्याला गावातील काही लोकांनी मारहाण केली. व जागेवरच सोडून दिले. गंभीर रित्या जखमी असलेला रविंद्र ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी च मयत झाला होता.जबर मारहाण झाल्या बद्दल त्याचा मृत्यू झाल्याचे समजले आहे.






