Faijpur

सुभाष चंद्र बोस स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी योद्धे – प्रा डॉ ए आय भंगाळे

सुभाष चंद्र बोस स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी योद्धे – प्रा डॉ ए आय भंगाळे

सलीम पिंजारी

स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बघता अनगिणत स्वातंत्र्यसैनिकांनी भारत मातेच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती दिली. त्यातील एक अग्रणी स्वातंत्र्यसैनिक म्हणून सुभाष चंद्र बोस यांचा नेहमी उल्लेख होतो . त्यांच्या कार्याची आणि व्यक्तित्वाची प्रेरणा आजच्या परिस्थितीत प्रत्येकाने घ्यावी, असे मत प्रा डॉ ए आय भंगाळे यांनी व्यक्त केले.

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीच्या वतीने सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी निलया ग्रुप ऑफ एज्युकेशन, पुणे चे ब्रँड ॲम्बेसिडर डॉ अविनाश शिरसाठ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ ए आय भंगाळे, राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे चेअरमन प्रा डॉ आय पी ठाकूर, प्रा डॉ जी जी कोल्हे, समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग, प्रा डॉ आर एन केसुर, प्रा निखिल वायकोळे, प्रा आरती भिडे, प्रा सचिन भिडे, दीपक काळे, गौरव राजहंस यांच्या उपस्थितीत सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ ए आय भंगाळे यांनी सुभाष चंद्र बोस यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. आणि भारत मातेच्या वीर सुपुत्रास व स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी योध्यास आदरांजली दिली व स्मृती जागवल्या. समाजातील प्रत्येक घटकाने ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा’ हे वाक्य छातीठोकपणे भारतीयांना सांगणार्‍या आझाद हिंद फौजेचे संस्थापक सुभाष चंद्र बोस यांना स्मरण करावे आणि समाज उभारणीसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सण उत्सव समितीचे चेअरमन प्रा डॉ आय पी ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा लेफ्ट राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button