Maharashtra

बारामती मधील त्या कोरोनाबाधित भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू.

बारामती मधील त्या कोरोनाबाधित भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : बारामती शहरातील कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याचा आज पहाटे मृत्यू झाल्याने शहरात खळबळ माजली असून आता सर्वांनीच याबाबत गंभीर होत काळजी घेण्याचे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित व्यक्तीस अर्धांगवायूचा त्रास होता. त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती सुध्दा कमी होती. सदर व्यक्तीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती अधिकचं खालावली होती. मात्र आज पहाटे उपचरादरम्यान सदर रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांच्याच कुटुंबातील मुलगा, सून व दोन नातींनाही कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.बारामती शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला असला तरी या घटनेनंतरही लोक मात्र रस्त्यावर फिरत असून लोकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button