Amalner

अमळनेर येथील न.पा.सेवानिवृत्त शिक्षकांचे थकीत पेन्शनचा प्रश्न मार्गी लागला…

अमळनेर येथील न.पा.सेवानिवृत्त शिक्षकांचे थकीत पेन्शनचा प्रश्न मार्गी लागला...

अमळनेर : अमळनेर नगरपरिषद सेवानिवृत्त /कुटूंब निवृत्ती शिक्षकांचे पेन्शन चार महिन्यापासून थकीत होते.त्यासंदर्भात नागरी हीत दक्षता समितीने अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील,मुख्याधिकारी डॉ.सौ.विद्या गायकवाड व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचेशी संपर्क साधला असता थकीत पेन्शनचा प्रश्न गंभीरपणे घेऊन सकारात्मक भुमिका घेत नगरपरिषदेने ३६ लाख थकीत पेन्शनसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला..सदर रकमेचा धनादेश नगरपरिषद शिक्षण मंडळास देण्यात आल्याने सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.सर्व शिक्षकांनी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे आभार मानले.वृध्दांच्य वेदनेशी नाते जोडून त्यांच्य थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागला हे खुप मोठे काम झाले.उर्वरीत थकीत वेतन मार्च २०२१ पर्यंत देण्याचे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी डॉ.सौ.विद्या गायकवाड यांनी मान्य केले…
सदर प्रसंगी प्रा.अशोक पवार,सत्तार मास्टर,बन्सीलाल भागवत,गं.का.सोनवणे,श्रावण गुरुजी,नगरसेवक मनोज पाटील,विक्रांत पाटील,रविंद्र पाटील व सेवा निवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button