Jalgaon

वाहन चालविताना वेग मर्यादा व नियमांचे पालन केल्यास प्रवास सुखकर – जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

वाहन चालविताना वेग मर्यादा व नियमांचे पालन केल्यास प्रवास सुखकर - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

       वाहन चालविताना वेग मर्यादा व नियमांचे पालन केल्यास प्रवास सुखकर – जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जळगाव :- वाहन मग ते दुचाकी पासून चार चाकी किंवा त्याहीपेक्षा कितीही  मोठे  असोत ते चालवितांना वेग मर्यादा व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास स्वत:बरोबरच आपल्या कुटूंबाचीही तसेच आपल्या मागे-पुढे चालणाऱ्या वाहन चालकाची सुरक्षा अबाधित राहिल याची जाणीव ठेवून वाहनचालकांनी वाहने चालवावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे  यांनी  जिल्हा रत्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत उपस्थीतांसमोर केले.. 
    याप्रसंगी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा रस्ता सुरक्षा समिती जळगाव श्याम लोही, अपर जिल्हा पोलीस अधिक्षिका  भाग्यश्री नवटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता  स्वाती भिरूड, सहाय्यक अभियंता आर. पी. पाटील, अभियंते एस. एम. साळुंखे, पोलीस निरीक्षक एस. एन. पठाण, डी.बी.सोनवणे, रस्ते बांधणी यंत्रणेतील महेश शोरम, एफ.एस.काझी, एस.के.राज, शिरोळे आदि अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.     


जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे  पुढे म्हणाले की, रस्ता सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करताना अनेक अडथळे येतात त्यात प्रामुख्याने पार्किंग प्रश्न, नो एन्ट्रीच्या ठिकाणी वाहने उभी करणे, चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करणे. यामुळे रस्ता वाहतुकीला अडचणी येतात. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी शक्यतो रात्रीचे प्रवास टाळावेत. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच रात्रीचा प्रवास केल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होतील. 
      अनधिकृत वाहने आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी किंवा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करावेत. शाळा महाविद्यालयांमध्ये पालक-शिक्षक सभांना वाहतूक पोलीस व परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वाहनाच्या मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करण्याने आपल्या पाल्याच्या जिवापेक्षा पैसा महत्वाचा नसून 200 ते 300 रूपये जास्त लागत असल्यास व मर्यादित संख्येत  विद्यार्थी घेवून जाणाऱ्या वाहनातूनच आपल्या पाल्याला पाठवावे. असे त्यांचे प्रबोधन करावे. अपघातग्रस्त व्यक्तीला वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य मानले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक भावनेतून 108 क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलवणे, अपघातग्रस्त व्यक्तीं कोण आहे, हे महत्वाचे नाही तो माणूस आहे. हे लक्षात घ्यावे. 

वाहन चालविताना वेग मर्यादा व नियमांचे पालन केल्यास प्रवास सुखकर - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

    रस्ते बांधणीतील यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्टीय महामार्ग प्रकल्प , नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग यांनी बांधकाम यांनी रस्ते तयार करतांना किंवा दुरूस्ती तथा नुतनी करणाच्या वेळेस मक्तेदारांची गुणवत्ता लक्षात घ्यावी. शहर, गाव किंवा अन्य कोणत्याही ठिकणी तयार केलेले अनावश्यक गतीरोधक तात्काळ काढून टाकावेत. रस्तांचे कामे चालू  असतांना अपघात व वाहन धारकांना त्याची कल्पना येणासाठी मक्तेदारांनी आवश्यक दिशानिर्देशक फलक, बॅरिकेट्स लावणे आवश्यक आहे. व ते लावले गेले नसल्यास अशा  रस्ते बनविणाऱ्या मक्तेदारांवर कठोर कारवाई करावी .
            रस्ते वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शाळा महाविद्यालयामधून लहान-मोठ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावेत. तसेच त्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घ्यावी असेही शेवटी  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सूचित केले.    
         

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button