Parola

मोंढाळे पिंपरी येथील शेतकऱ्यांचे वीज वितरण ला निवेदन.

मोंढाळे पिंपरी येथील शेतकऱ्यांचे वीज वितरण ला निवेदन.

मोंढाळे पिंपरी येथील शेतकऱ्यांचे वीज वितरण ला निवेदन.
 पारोळा प्रतिनिधी:- कमलेश चौधरी
 तालुक्यातील मोंढाळे पिंपरी येथील शेतकरी रवींद्र भालेराव पाटील या शेतकऱ्याचा दिनांक 7 सप्टेंबर रोजी शेतात बैलगाडीवर वख्खर ठेवत असताना त्या वख्खराची लोखंडी दांडी खाली लोम्बकळत्या वीज तारांना  स्पर्श झाल्यामुळे तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता.या मृत्यूला विज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार व हलगर्जीपणा जवाबदार असून यामुळे देशाला अन्नधान्य पूरवणार्‍या बळीराजाच्या उरावर महावितरण कंपनी असल्यामुळे मृत्यू झालेल्या या गरीब शेतकऱ्याचे वय 35 वर्षे असून त्याच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, तीन मुली व पाच महिन्याचे बाळ आहे.आज कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यांना पोषणारा पोशिंदा कुटुंबकर्ता निव्वड आपल्या भोंगळ कारभारामुळे मरण पावला आहे. म्हणून आम्ही सर्व मोंढाळे,पिंप्री,उंदिरखेडे येथील  शेतकरी,ग्रामस्थ वीज वितरण कंपनी पारोळा व शासनाला विनंती करतो की या कुटुंबाला व त्यांच्या वारसाला सरकारी नोकरी व वीस लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी. आज सुद्धा मोंढाळे पिंपरी गावात पारोळा टोळी रस्त्यावर जवळजवळ ८ ते १०  फूट  उंचीवर तारा खाली आलेल्या आहेत. त्या तारा आठ दिवसाच्या आत सरळ करण्यात आल्या नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ आमरण उपोषण, रास्ता रोको, आत्मदहन, यापैकी कोणताही मार्ग स्वीकारु  यासाठी वीज वितरण कंपनीने व  शासनाने लक्ष घालून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे. सदर निवेदन वीज वितरण कंपनीचे उपमुख्यकार्यकारी अभियंता प्रसाद.एम.पाटील यांना देण्यात आले.  निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते उमेश बाबुराव पाटील(उंदिरखेडे), संजय भालेराव पाटील, संदीप नारायण पाटील, विजय भालेराव पाटील, प्रशांत लहू पाटील, बळवंत गोविंदा बाविस्कर, दगडू शिवाजी पाटील,दत्तात्रय नगराज पाटील,चंद्रकांत पाटील,हिम्मत पाटील,किशोर पाटील,साहेबराव पाटील,पंकज पाटील,राजेंद्र पाटील,विनोद बाविस्कर, मयूर पाटील,गुलाब पाटील,यशोधन पाटील यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button