Amalner

?️?समाजीकतेचे भान,दोस्तीच्या दुनियेतील शान.. कोरोनात अनेकांचा आधार..शतायुषी व्हा भरतभाऊ पवार ….

?️ सामाजिक कार्यकर्ता,दोस्तीच्या दुनियेतील राजा व्यक्तिमत्व भरत भाऊ पवार यांना जन्मदिनाच्या आदिम शुभेच्छा…..

अमळनेर एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता,दोस्तीच्या दुनियेतील राजा व्यक्तिमत्व,मन मिळावू स्वभाव कोणतेही काम असू देत ते तडीला नेण्याची हिम्मत आणि प्रचंड इच्छा शक्ती असलेले भरत भाऊ पवार….कोरोना च्या आपत्ती व्यवस्थापन काळात कोणत्याही प्रकारचा लाभ लोभ नसताना निस्वार्थी पणे गेल्या 6 महिन्यापासून ड्युटी वर असलेल्या पोलीस बांधव,प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना आरोग्यासाठी उप कारक आयुर्वेदिक चहा देण्याचे कार्य सतत सुरू आहे.

त्याचबरोबर कोरोना बाधित रुग्ण, गरजू, कोविड योद्धाना गेल्या सहा महिन्यापासून
स्वखर्चाने मालेगावचा ‘युनानी’ काढा वाटप करण्याचे काम अमळनेर शहरातील भरत पवार करीत आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक सर्व स्तरातून केले जात आहे.

भरत पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व असून आज पर्यंत पक्षाशी इमानदार राहत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता अमळनेर शहरासह तालुक्यात पक्ष वाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. पक्षाकडून नेहमी उपेक्षित राहूनही त्यांनी कधी तक्रारीचा सूर काढला नाही.

निस्वार्थी व्यक्तिमत्व भरत पवार यांचा आज ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन आहे आणि त्यांचे आयुष्य निरोगी,खुशी युक्त जावे या साठी सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी,मित्र परिवार यांनी सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button