Maharashtra

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात शिल्लक पोषण आहाराचे सोशल डिस्टिंगशनचे नियम पाळून वाटप

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात शिल्लक पोषण आहाराचे सोशल डिस्टिंगशनचे नियम पाळून वाटप

औसा प्रतिनिधी प्रशांत नेटके

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शाळा ,कॉलेज शासनाच्या वतीने बंद आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाने राज्य व देशच नव्हे तर संपूर्ण जग लाँक डाऊन असताना घरा घरातील विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहारासाठी घराबाहेर पडण्यास बाध्य करणारा शासनादेश धडकल्याने विद्यार्थी पालकांसह शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत होते.
लॉकडाऊन कालावधीत घराबाहेर न पडण्याच्या सूचना शासनाने दिले असून आता त्यांनी काढलेल्या आदेशामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पोषण आहार घेण्यासाठी आणि ते वाटप करण्यासाठी शिक्षकांना घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे.
दिनांक १० एप्रिल रोजी
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन काळात पोषण आहारापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना तांदूळ डाळी /कडधान्य वितरण करण्यात आले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील येईल सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळा संचारबंदी असेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. या काळात शालेय विद्यार्थी व लहान बालके शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये याकरिता शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळ कडधान्य विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले. सदर आदेशान्वये शाळेतील शिल्लक पोषण आहाराचा साठा मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत वाटप करावयाचा आहे. यासाठी प्रत्येक शाळा स्तरावरून प्रसिद्धी करून विद्यार्थी व पालकांना रांगेत उभे करून वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यावेळी गावातील भीम आर्मीचे लक्ष्मण कांबळे, प्रशांत नेटके (औसा प्रतिनिधी)
शाळेचे मोहनराव मोरे, शिक्षिका संतोषीमाता लोहार, अनुराधा कनामे, सिद्धेश्वर आयरेकर, विलास चव्हाण, प्रदीप इज्जपवार, अशोक पवार, धर्मराज भिसे, शालेय व्यवस्थापन समितीचे बालाजी कवठाळे, व्यंकट बिराजदार, शिवशंकर बिराजदार,हे उपस्थित होते.
विशेष म्हणजे शाळांमध्ये सर्व पालकांना टप्प्याटप्प्याने शिल्लक धान्य साठाचे वाटप करण्यात आले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button