प्रताप कॉलेज को-ऑफ क्रेडिट सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड….
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील प्रताप कॉलेज को-ऑफ क्रेडिट सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी विजय पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी या पदावर विलास चौधरी होते. मात्र ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांना हे पद सोडावे लागले होते. म्हणून नंतर हे पद रिक्त असल्याने व्हाईस चेअरमन पदासाठी निवड संपन्न झाली. व चौधरी यांच्या जागेवर विजय पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






