Chalisgaon

भाजपा उमेदवार मंगेश चव्हाण यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद,

भाजपा उमेदवार मंगेश चव्हाण यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद,

गावागावातुन खांद्यावर मिरवणूक

नितीन माळे

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण याचा आजचा प्रचार दौरा बेलगंगा डोनदिगर डोन पिंपरी माळशेवगे या भागात सकाळच्या वेळेत झाला असून या प्रत्येक गावात मंगेश चव्हाण यांना मतदारांचा प्रतिसाद मिळाला असून प्रत्येक गावातून अक्षरशा कार्यकर्ते मतदारांनी त्यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली व ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. महिला भगिनींनी औक्षण करून तर पुरुषांनी गुलाल उधळून मंगेश चव्हाण यांच्या नावाचा जयघोष करीत विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी मंगेश चव्हाण यांनी तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून तुमचा भाऊ, सहकारी, मित्र मुलगा म्हणून मला साथ द्या आणि सेवेची संधी द्या असे आव्हान सर्व मतदार बंधू-भगिनींना केला. गावागावातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता चव्हाण यांच्या मताधिक्यात प्रचंड वाढ होणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button