Amalner

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमळनेर प्रशासन सज्ज..उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक स्वतः करत आहेत पेट्रोलिंग आणि जन जागृती

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमळनेर प्रशासन सज्ज.उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक स्वतः करत आहेत पेट्रोलिंग आणि जन जागृती

अमळनेर

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा प्रसार होऊ नये म्हणून अमळनेर प्रशासन सज्ज झाले आहे. मा प्रांताधिकारी सिमा अहिरे,मा तहसीलदार मिलिंद वाघ,मा पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मा नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे प्रतिनिधी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सज्ज झाले आहेत.

?? कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून अमळनेर शहर आणि तालुक्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

  • त्यात परदेशातून स्वदेशी आलेल्या ८नागरिकांना होम क्वाॅरंटाइन केले आहे.यापैकी ३ दुबई, कॅनडा व थायलंडमधुन प्रत्येकी २बआणि एक जण तुर्कस्थानातून आलेला आहे.
  • या सर्वांवर व त्यांचे कुटुंबीयआजूबाजूच्या रहिवाशांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
  • दरम्यान संचारबंदी लागू असल्याने नागरिकांचीगैरसोय टाळण्यासाठी प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी अमळनेरात अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी वेळा ठरवून दिलेल्या आहेत.
  • त्यानुसार मेडिकल, लॅब, दवाखाने २४ तास सुरू राहतील. त्यात किराणा दुकान सकाळी ८ ते दुपारी १२, दूध विक्री
  • सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६ ते रात्री ८ भाजीपाला सकाळी ८ते दुपारी १२ वाजेपर्यंत विक्री करता येईल
  • भाजीपाला सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यत विक्री करता येईल.
  • नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करावी असे आदेश प्रांत अधिकाऱ्यांनी दिले आहेत
    तसेच तहसीलदार , पोलीस निरीक्षक तालुक्यातील घडामोडी लक्ष ठेवून आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करायचा असेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करीत आहे .

त्याबरोबर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात देखील सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून आतापर्यंत तालुक्यातील एकूण 543 प्रवाशी नागरिक नोंद ग्रामीण रुग्णालयात केली गेली असून पुढील बाहेर गावाहून प्रवाशांची नोंदणी व प्रथम चाचणी केली जात आहे. त्याच प्रमाणे दोन विलगिकरण कक्ष तयार असून गरज पडल्यास इंदिरा भवन येथे 10 विलगिकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ ताळे यांनी दिली.

अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोरोना संदर्भातील नियम,अटी, लक्षणे,घ्यावयाची काळजी इ फलकांच्या द्वारे माहिती देण्यात येत आहे. सकाळीच सर्व अधिकारी गस्ती साठी फिरत असून ठीक ठिकाणीB भेटी देऊन सूचना देण्यात येत आहेत. रात्रंदिवस संपूर्ण प्रशासन कार्यरत असून पोलीस बांधव ठिकठिकाणी तैनात आहेत.पोलीस बंदोबस्तासाठी बाहेरून जादाचा फोर्स मागविण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button