गुरुनाथ बनोटे यांना सिंगापूरमध्ये डॉक्टरेट पदवी प्रदान…..!
राहुल खरात
बदलापूर येथून २५ वर्षांपासून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक उल्हास प्रभातचे संपादक गुरुनाथ बनोटे यांना कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल घेत त्यांना ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. सिंगापूरमध्ये नुकताच झालेल्या पदवीप्रदान कार्यक्रमात किंग्डम ऑफ टोंगा येथील कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने त्यांना ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिसचे संचालक डॉ. एडवर्ड, बँकॉक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तोषापोन, बँकॉक युनिव्हर्सिटीचे डॉक्टर पारसर्ट, कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी व युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चे सल्लागार डॉ. परमेश्वरन, आणि देसाई ग्लोबल प्रमोटरचे डॉ. अजय देसाई यांच्या हस्ते श्री. गुरूनाथ बनोटे यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.






