Erandol

अपघातात गंभीर जखमी झालेल्या एरंडोल आगाराच्या चालक कल्पेश निकम चे निधन

अपघातात गंभीर जखमी झालेल्या एरंडोल आगाराच्या चालक कल्पेश निकम चे निधन

विक्की खोकरे
एरंडोल
17 मार्च राजी पारोळा तालुक्यातील विचखेडा या गावाहून एरंडोल कडे परत येत असताना म्हसव्या फाट्याजवळ स्वतःच्या दुचाकीवरून येत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या एरंडोल आगारचा चालक कल्पेश प्रकाश निकम याचे मुंबई येथील के एम हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असतांना निधन झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की की कल्पेश प्रकाश निकम वय 36 वर्ष हा एरंडोल आगारात चालक तथा वाहक या पदावर तीन वर्षांपासून कार्यरत होता सुरुवातीला त्याचे मुळगाव विचखेडा येथून त्याने ये जा करीत ड्युटी केली मात्र अलीकडेच त्याने एरंडोल येथील विद्यानगर येथे घर भाड्याने घेतले होते 17 मार्च रोजी आपल्या गावी आईला सोबत घेऊन दुचाकीवरून गेला होता मात्र सायंकाळी एरंडोल कडे परत येत असतानाच म्हसव्या फाट्याजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात टँकर ने जबर धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता
त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या दूध वाल्याने जखमी अवस्थेत बघितले व रस्त्यावर पडलेल्या कलपेशच्या मोबाईलवर फोन करून अपघाताची माहिती दिली.

यानंतर त्याला धुळे येथील सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्या नंतर ताबडतोब मुंबई येथील के एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तीन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या कलपेशचा अखेर काल रोजी मृत्यू झाला त्याचेवर शनिवारी विचखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले.

वडील नसलेल्या कलपेशच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी व एक पाच वर्षांचा मुलगा असा छोटा परिवार आहे घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने या परिवारावर मोठे दुःखच कोसळले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे यापूर्वी नंदुरबार आगारात काम केलेल्या कलपेशचा स्वभाव मितभाषी,प्रेमळ व शांत असल्याने एरंडोल आगारातील सर्व कर्मचारी बंधूंना देखील त्याच्या निघून जाण्याने एक धक्काच बसला आहे सर्व कर्मचारी बांधवांनी एकत्रित येऊन त्याच्या परिवाराला जवळपास तीस हजार रुपयांची रोख मदत करून त्याला वाचविणे कमी प्रयत्न केले मात्र यश न मिळाल्याने सर्वांनी दुःख व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button