?️ ठोस प्रहार ब्रेकिंग अमळनेर कोविड केअर सेंटरची सद्य स्थिती
अमळनेर येथे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर केंद्र सुरू करण्यात आले आहे. आजच्या स्थितीला याठिकाणी नवीन इमारतीत असलेल्या कक्षात 11 रुग्णांचे स्वॕब घेण्यात आले असून तपासणी साठी पाठविले आहेत.तर जुनी इमारत कक्षात असलेले 2 सकारात्मक रुग्ण आहेत .संशयित 3 रुग्णांचे अहवाल बाकी आहेत. अशी माहिती डॉ गणेश पाटील वैद्यकीय अधिकारीयांनी दिली आहे.स्टाफ नर्स लता व्ही चौधरी,बऔषध निर्माता गिरीश शिंदे उपस्थित होते.
सध्या येथे 100 बेड ची व्यवस्था करण्यात आली आहे.या कोविड केंद्रावर शिफ्ट प्रमाणे कार्य सुरू असून तीन शिफ्ट सुरू आहेत. सफाई कामगार शिफ्ट प्रमाणे कार्य करत असून दोन वेळा साफ़ सफाई फवारणी दोन वेळा साफ सफाई केली जात आहे.अशीही माहिती येथे उपस्थित डॉ गणेश पाटील यांनी दिली आहे.






