पारोळा व चाळीसगाव तालुक्यातील सिंचनाला १४ बंधारे मंजुरीने बळकटी,
खासदार उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
चाळीसगाव – प्रतिनिधी मनोज भोसले
पारोळा तालुक्यातील पुनगाव, महाळपूर, उंदीरखेडे १ व २ यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील देवळी १ व २, वरखेडे, उंबरखेड, रामनगर, दरेगाव, बेलदारवाडी, भामरे, भोरस, टाकळी प्रदे अश्या १४ बंधाऱ्याना जलसंधारण विभागाकडून सुमारे १३ कोटी १४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या कामांची निविदा प्रसिद्ध झाल्याने येत्या वर्षभरात या परिसरात शेती सिंचनासह परिसरातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. खासदार उन्मेश पाटील यांनी जलसंधारण विभागाकडून ही कामे मंजूर करून घेतल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.







