Aurangabad

गुरू शिवाय मनुष्याचे जीवन व्यर्थ आहे – पाटील

गुरू शिवाय मनुष्याचे जीवन व्यर्थ आहे – पाटील

गणेश ढेंबरे औरंगाबाद

माणसाच्या जीवनाला गुरू शिवाय महत्व नाही .आदर्श जीवन जगण्यासाठी गुरूचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. म्हणुन गुरू शिवाय मनुष्याचे जीवन व्यर्थ आहे असे मत ए.जे.पाटील यांनी व्यक्त केले.

वैजापूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यु हायस्कूलमध्ये गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. डी. सोनवणे हे होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती हा गुरू वीणा अधुरा असतो. मनुष्य जन्माला आल्यापासून त्याच्यावर नाना प्रकारचे संस्कार होत असतात. त्यामध्ये आई, वडील व गुरुजन यांचे योगदान महत्वाचे आहेत. अंधारातुन प्रकाशाकडे नेतात ते गुरू असतात. गुरूचे मार्गदर्शन नसलेला एकही मनुष्य नाही. कोणत्या कोणत्या रूपाने आपण कोणाचे ना कोणाचे मार्गदर्शन घेत असतो तेच आपले गुरू असतात. आपल्या जीवनाला सर्वांगीण सुंदर बनविण्यासाठी गुरूची नितांत आवश्यकता असते असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमास पर्यवेक्षक तुपे ,पी.यु.जाधव, एस.पी.आहेर, एस.ए.शेंगाळ, वाणीसर, श्रीवास्तव, श्रीमती एस.बी.कोल्हे यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button