जमिनीच्या वादावरून भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानास मारहाण
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : जमिनीच्या वादावरून भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानास, गोविंद पवार यांस लाकडी दांड्याने जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथे ११ जुलै रोजी रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सावखेडगंगा येथील ९ जणांविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध 326 गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंद बापुसाहेब पवार वय ३५ वर्षे असे या घटनेतील जबर जखमी झालेल्या सैनिकाचे नाव आहे. गोविंद पवार यांच्या डोक्यात जबर मारहाण करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या डोक्यात २२ टाके पडले आहेत. गोविंद पवार हे भारतीय सैन्यदलात कार्यरत असुन सध्या ते सुट्टीवर आहेत.
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले गोविंद पवार आणी ज्ञानेश्वर खटाणे यांच्या कुटुंबामध्ये बर्याच दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. जमिनीच्या वादामुळे ज्ञानेश्वर खटाणे यांनी आपल्या कुटुंबीयांसह लाडगांव सावखेडगंगा रोडवर शेतात आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या गोविंद पवार यांस लाकडी दांड्याने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोविंद पवार यांच्या डोक्याला जास्त मार लागला. त्यामुळे गोविंद पवार यांना औरंगाबाद येथील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गोविंद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावखेडगंगा येथील ९ जणांविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात (दाखल) करण्यात आला आहे. अजुनही ९ जणांना ताब्यात घेण्यात आले नाही. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.






