Paranda

परंडा तालुक्यातील खैरी नदीपाञात सापडलेला डोंजा येथील प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याच्या मार्गावर!!

परंडा तालुक्यातील खैरी नदीपाञात सापडलेला डोंजा येथील प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याच्या मार्गावर!!

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा तालुक्यातील डोंजा येथील खैरी नदीपाञात ११ व्या शतकातील प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले होते.याबाबत ऐतिहासिक परंडा तालुक्याची पर्यटन मार्गदर्शिका तयार करणारे, इंडियन नॕशनल ट्रस्ट फाॕर आर्ट अॕण्ड कल्चरल हेरिटेज नवी दिल्लीचे अजीव सदस्य अजयकुमार माळी यांनी संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रालय संचलनालय मुंबई यांना याचे जतन व संरक्षण व्हावे म्हणुन पञ दिले होते.या पञाची दखल घेऊन संभाजीनगर पुरातत्व विभागाचे कर्मचारी संभाजीनगर पुरातत्व विभागाचे अधिकारी डाॕ.कामाजी डक व परंडा किल्ला प्रमुख ज्ञानेश्वर गावडे व सहकारी यांनी सदरील प्राचीन अवशेष सापडेल्या नदीपाञातील घटनास्थळाची पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला होता.

अद्याप तीन महिन्याचा काळ उलटुनही गेला आहे.पावसाळा सुरु झाला असुन खैरी नदीपाञात पाणीसाठा जमा होण्यास सुरुवात झाली असल्याने हा सापडलेला प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आता नेमका पावसाळा सुरु झाला असुन खैरी नदीपाञात पाणीसाठा जमा होवु लागला आहे.एखाद्या जोरदार पावसाने नदीपाञात पाणी वाढल्यास हा सापडलेला प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.संबधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मोठी गरज आहे.अशी मागणी ऐतिहासिक प्रेमी,तालुकावासिंयाची आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button