?️अमळनेर कट्टा… दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये शेतकरी सन्मान मेळावा पार
अमळनेर : दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये ,अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार दि 10/02/2021 रोजी दुपारी 1:00 वाजता शेतकरी सन्मान मेळावा पार पडला. सदर मेळाव्यात केंद्राचे “तीन काळे कृषी कायदे ” शेतकरी वर्गासाठी कसे घातक आहेत या विषयावर शेतकरी नेते एस बी पाटील यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांताराम पाटील हे होते . या मेळाव्यास तालुक्यातील शेतकर्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सुलोचना वाघ , किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृषिभुषण सुरेश पाटील, अमळनेर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अलिम मुजावर, शहराध्यक्ष जुबेर पठाण, राहुल गांधी विचारमंच जिल्हाध्यक्ष रहेमान खाटीक, जेष्ठ नेते धनगर पाटील, डॉ अनिल शिंदे , बी के सुर्यवंशी , संदीप घोरपडे, बन्सिलाल भागवत, पद्माकर गोसावी, संदीप पाटील, मुन्ना शर्मा, रज्जाक शेख, शाम पवार, जयवंत पाटील, प्रविण जैन, रोहीदास पाटील, विवेक पाटील, मनोज बोरसे , सईद तेली, गजेंद्र साळुंखे, मयुर पाटील, कैलास पाटील, उमाकांत पाटील, अझहर सय्यद, रिजवान शेख , समीर शेख, फिरोज शेख, हर्षल जाधव , योगेश पाटील, सुनिल पवार, संतोष पाटील, तिर्थक देसले, रिंकेश कोळी, राज पाटील, अतुल भागवत व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. सदर मेळाव्याचे सूत्रसंचालन बी के सुर्यवंशी यांनी तर आभार तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी व्यक्त केले.






