? कोरोना आपात्कालीन परिस्थितीत खा.शि.च्या खादाड धनदाडंग्याना निवडणूक महत्वाची…
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथे नुकतीच खादाड शिक्षण मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. संपुर्ण देशात,महाराष्ट्रात अमळनेर शहरात कोरोनाच्या विषाणू च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत. सामान्य माणसाला एक वेळच अन्न मिळणं मुष्कील झालं आहे. मजूर,कामगार,रोजंदारी वर काम करणारे लाखो हात थांबले आहेत.मुलं बाळ, कुटुंब कसं चालवावे उदर निर्वाह कसा करावा?हाता तोंडाची मिळवणी कशी करावी?असे अनेक प्रश्न लाखो गरीब जनतेच्या समोर असताना अमळनेर खादाड शिक्षण मंडळाला निवडणूक सुचत आहे.

धनदांडगे पोटाच्या ढेऱ्या वाढवत जनतेचाच पैसा रिचवत निवडणूक लढवत आहेत तीही ऑन लाईन? यातील एकही धन दांडगा आता पर्यंत कोरोना च्या लढाईत ना ऑनलाईन उतरला ना ऑफलाईन कुठे गेले सगळे तथाकथित बिल्डर्स,शैक्षणिक संस्थांचे तथाकथित मालक दुसऱ्याच्या जीवावर पोळी भाजणारे आणि खान्देश शिक्षण मंडळाची दशा आणि दिशा बदलवून स्वतः गेरेदार,ढेरिदार होऊन जनतेची विद्यार्थ्यांची पालकांची, शिक्षकांची,प्राध्यापकांची,सदस्यांची दिशाभूल करून शिक्षणाचा बाजार मांडणारे कोरोनाला घाबरत आहेत की आपला पापाचा घडा कोरोना च फोडेल म्हणून घाबरत आहे ?
आपापसात च पदे वाटून घेऊन तू मी भाऊ भाऊ दोन्ही मिळून लई खाऊ …असा विचार करत शिक्षणाच्या पंढरीला खादाड संस्थेत रूपांतरित केलेल्या ह्या धन दांडग्या ना म्हणावं जरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोर गरीब जनतेला मदत करा….एसी च्या थंड हवेत कोरोना लवकर धरतो बरं…जरा या बाहेर उन्हात संक्रमित गोरे रंग जरा काळे पडू द्यात…बघा कोरोना होणार नाही..शपथ कधीच होणार नाही…






