Amalner

?️ अमळनेर कट्टा… भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ.स्मिताताई वाघ यांची नियुक्ती पक्षनेतृत्वाने मोठी संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

?️ अमळनेर कट्टा… भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ.स्मिताताई वाघ यांची नियुक्ती पक्षनेतृत्वाने मोठी संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

अमळनेर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी आमदार तथा भाजपच्या जेष्ठ नेत्या श्रीमती स्मिता उदय वाघ यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीवर प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ही नियुक्ती केली असून याबाबत चे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
त्यांच्या नियुक्तीची ही माहिती अमळनेर तालुका व जळगाव जिल्ह्यात समजताच कार्यकर्त्यांनी उत्साहित होऊन प्रचंड आनंद व्यक्त केला,स्मिता वाघ यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या पदांवर काम केले असले तरी ही अतिशय मोठी संधी त्यांना मिळाली असून त्यांच्या त्यांच्या रूपाने भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर जळगाव जिल्ह्यास मोठे स्थान मिळाले आहे.विद्यार्थी दशेपासून स्मिता वाघ यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपाशी जुळल्या असून स्व.उदय वाघ यांच्या खंबीर साथीने भाजपाशी त्यांचे ऋणानुबंध वाढतच गेलेत,सुरवातीला जिल्हा परिषद सदस्य,विद्यापीठात सिनेट सदस्य,जळगाव जिल्हा परिषद सदस्य,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, भाजपा प्रदेश चिटणीस आदी विविध पदांवर त्यांनी प्रतिनिधित्व करून आपल्या कार्याची चुणूक त्यांनी वाढविली आहे.स्व.उदय वाघ यांच्या अकाली निधनाने त्यांना धक्का बसला असताना पक्ष आणि कार्यकर्ते यांच्या खातीर त्यांनी स्वतःला सावरून पक्ष कार्यात त्या सक्रीयच राहिल्या,एक खंबीर महिला नेतृत्व म्हणून प्रदेश पातळीवरील नेत्यांचे देखील त्यांच्याकडे लक्ष असल्याने या कणखर व अभ्यासू व क्रियाशील नेतृत्वास बळ देण्यासाठी त्यांना प्रदेश उपाध्यक्ष ही मोठी संधी पक्षांने दिली असून ता नियुक्ती बद्दल त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पक्षनेतृत्वाने दिलेल्या या बहुमानाबद्दल त्यांनी माजी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन यासह पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले आहेत.

?️ अमळनेर कट्टा... भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ.स्मिताताई वाघ यांची नियुक्ती पक्षनेतृत्वाने मोठी संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button