Amalner

अमळनेर येथे अजून पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल

अमळनेर येथे अजून पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल

अमळनेर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वारंवार सूचना देऊनही विनाकारण फिरणाऱ्या अजून पाच जणांवर पोलिसांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंनघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संचारबंदी लागू असतानाही विनाकारण गावात फिरणाऱ्या शरद विश्वास पाटील रा.टाकरखडा, दिपक पुंजू वाणी रा. पारोळा , संजय ब्रिजलाल पाटील रा. रणाईचे, सतीश हरी कांगणे रा. अमळनेर, विजय सुरेश पाटील रा. पळासदळे यांना बस स्थानक समोर पोलिसांनी थांबवून फिरण्याचे कारण विचारले असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे देवून काही एक कारण नसतांना विनाकारण बाहेर फिरुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्या पाचही व्यक्तींविरुद्ध भादवि कलम 188 प्रमाणे अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना राजेश चौहान हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button