Amalner

?️ Big Breaking… रुग्ण असल्याची अफवा पसरविणाऱ्या बहादरवाडीच्या युवकास प्रशासनाने दिला चोप…

?️ रुग्ण असल्याची अफवा पसरविणाऱ्या बहादरवाडीच्या युवकास प्रशासनाने दिला चोप…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर

बहादरवाडी येथील पुणे येथून आलेला युवक अमोल पाटील याने मला कोरोना ची लागण झाली आहे अशी माहिती भ्रमण ध्वनी वरून सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी यांना दिली. संबंधित घटनेची माहिती अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना दिली असता त्यांनी ताबडतोब बहादरवाडी येथे 108 एबुलन्स पाठवून आशा वर्कर्स देखील सदर युवकास तपासणी साठी पाठविल्या.

परंतु नंतर मात्र सदर अमोल पाटील या युवकाने मी प्रशासनाची मजा घेत होतो मला काही झालेले नाही असे प्रशासकीय कर्मचारी यांना प्रत्यक्ष आणि आशिष चौधरी यांना भ्रमण ध्वनी वरून सांगितले.या अनुषंगाने मा तहसीलदार मिलिंद वाघ आणि पोलीस निरीक्षक अंबादास मोरे हे स्वतः बहादरवाडी येथे गेले आणि सदर युवकास प्रशासनाचा चांगलाच इंगा दाखविला.मजबूत झोडपून काढत गावातही हा संदेश दिला की जर कोरोना च्या अत्यन्त बिकट परिस्थितीत कोणी प्रशासनाची मजाक करत असेल आणि अत्यन्त संवेदनशील असलेल्या या विषयात जर शासकीय कामात आणि सेवेत अडथळा आणत असेल तर त्यांना योग्य तो चोप देऊन,योग्य ती कार्यवाही देखील केली जाईल.याची नोंद घ्यावी. कृपया जनतेने सहकार्य करावे..

रात्रंदिवस उपविभागीय,तहसिल,पोलीस प्रशासन आपल्या साठी झटत आहे.खूप नियोजन आहे.संपूर्ण तालुका आणि नागरिकांचे प्रश्न आहेत.सातत्याने जेवण न करता अधिकारी, कर्मचारी कार्य करीत आहेत. संपुर्ण यंत्रणा उभी आहे ती केवळ आपल्या आरोग्यासाठी…म्हणून कोणीही अश्या पद्धतीने गैरवर्तन करणे योग्य नाही. यावर ताबडतोब कार्यवाही होईलच की जेणे करून कोणीही अश्या अफवा पसरवून प्रशासनाला वेठीस धरणार नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button