Kolhapur

मुरगुड परिसरात पिकांचे मोठे नुकसान –

मुरगुड परिसरात पिकांचे मोठे नुकसान –

तुकाराम पाटील

मुरगुड (वार्ताहर) – यंदा महापुरामुळे नदीकाठ च्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातूनच सावरलेल्या पिकांना जीवदान मिळाले परंतु गेले काही दिवस परतीच्या पावसाने झोडपले असून त्याचा फटका भात शेतीला बसला आहे. भात शेतीच्या मळ्यात पावसाचे पाणी साचले असून भात शेती आडवी झाली आहे. यामुळे भात पिक कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. कापलेले भात भिजल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी भात कापणी केली आहे, त्याचे पिंजर शेतात पडून राहिल्याने कुजले आहे. त्यामुळे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button