Amalner

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अमळनेर मतदार संघात सकारताय 37 कि.मी.चे रस्ते 19 कोटी 37 लाखांचा निधी,आ.शिरीष चौधरींच्या हस्ते कामाचा टाकरखेडा ते कंडारी रस्त्याचा झाला शुभारंभ

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अमळनेर मतदार संघात सकारताय 37 कि.मी.चे रस्ते

19 कोटी 37 लाखांचा निधी,आ.शिरीष चौधरींच्या हस्ते कामाचा टाकरखेडा ते कंडारी रस्त्याचा झाला शुभारंभ

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अमळनेर मतदार संघात सकारताय 37 कि.मी.चे रस्ते 19 कोटी 37 लाखांचा निधी,आ.शिरीष चौधरींच्या हस्ते कामाचा टाकरखेडा ते कंडारी रस्त्याचा झाला शुभारंभ

अमळनेर संपूर्ण राज्यात रस्त्यांचे नूतनीकरण होत असताना आ.शिरीष चौधरी यांच्या कर्तृत्वामुळे अमळनेर विधानसभा मतदार संघ देखील मागे नसून जिकडेतिकडे रस्त्यांचे नूतनीकरण होताना दिसत आहे,यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 19 कोटी 37 लाख निधीतून मंजूर झालेल्या 37 किमीच्या ग्रामिण रस्त्यांची भर पडली असून ही कामे देखील आ.चौधरींनीच मार्गी लावली आहेत,प्रत्यक्षात ही कामे देखील सुरू झाल्याने ग्रामिण भाग शहराशी जोडला जात आहे.
           टाकरखेडा ते कंडारी या 1 कोटी 68 लाख निधीतुन होणाऱ्या 3.3 कि.मी.रस्त्याच्या कामाचे  भूमिपूजन नुकतेच आ.शिरीष चौधरींच्या हस्ते कंडारी येथे करण्यात आले.या प्रसंगी अनिता चौधरी, नपा गटनेते प्रवीण पाठक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता राजेंद्र ढाके, कनिष्ठ अभियंता विवेक पाटील, कंडारी सरपंच कविता हरी पाटील, ज्योत्स्ना संतोष लोहार, उपसरपंच शिवाजी भिल,जितेंद्र पाटील, मच्छिद्र ट्रेलर, रोशन सोनवणे,तुळशीराम पाटील,नाना पाटील, पुंडलीक पाटील, धनराज पाटील,हिराल पाटील,मधुकर पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपअभियंता  राजेंद्र ढाके यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्हासमितीवर आ शिरीष चौधरी सदस्य आहेत,त्यांच्या शिफारशीने आलेल्या प्रस्तावावरच कामे मंजूर होत असतात,यामुळे या रस्त्यांचे भाग्यविधाते तेच आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
असे होणार 37 किमीचे रस्ते
        लोण फाटा ते मुडी 5.6 किमी 2 कोटी 39 लाख,लोंढवे-निर्सडी-खडके अंचलवाडी 8.6किमी 3कोटी 30 लाख,टाकरखेडा ते कंडारी 3.3किमी 1कोटी 68 लाख,कामतवाडी रस्ता 4.3किमी 2कोटी 65 लाख 99 हजार,पातोंडा ते दापोरी 2 किमी 1कोटी 7 लाख,महाळपुर ते हिवरखेडा 4 किमी 2कोटी 28 लाख 67 हजार,कळमसरे ते तांदळी 5 किमी 2कोटी46 लाख,मारवड -गोवर्धन -बोरगाव-भोरटेक 3.5किमी
1कोटी 86 लाख.असे हे ऐकूण 37 किलोमीटर चे रस्ते 19 कोटी 37 लाख  निधीतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने सन  2018/19 अंतर्गत होणार आहेत.
गाव तेथे रस्त्याचा संकल्प खरा केल्याचे समाधान-आ.चौधरी
           
          अमळनेर मतदारसंघात विधानसभा सदस्य झाल्यानंतर गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एस. टी.असा संकल्प आपण केला होता,त्यानुसार गेल्या 5 वर्षात यशस्वी वाटचाल करून असंख्य रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात यश आल्याने आपले स्वप्न खरे ठरल्याचे समाधान असून आज मतदारसंघात कोणतेही गाव असो तेथून जास्तीतजास्त 30 ते 45 मिनिटात ग्रामिण भागाचा माणूस पोहचू शकत आहे,हा केवळ नवीन रस्त्यांचा परिणाम असून यामुळे शेतकरी बांधवांचा शहराशी संपर्क वाढून त्यांना पूरक व्यवसाय करण्यास चालना मिळत असल्याची भावना आ.शिरीष चौधरींनी व्यक्त केली आहे.व या कामांसाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगत आभार देखील व्यक्त केले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button