खासदार उन्मेश दादांच्या भेटीने तोफगाडे निर्मितीकार अजय जोशींना आनंदाश्रू
रात्रीच्या भेटीत कलाकाराच्या मनोबलाचा काजवा चमकला
मनोज भोसले
चाळीसगांव — आपल्या परिस्थितीला पोटात घालत कारागीर मनातील संकल्पना घडवीत असतो. समाज असो वा परिवार असो प्रतिकूल परिस्थितीत कलाकाराची कला अधिक धारदार होते . याचाच प्रत्यय सध्या चाळीसगावकरांना लाकडी कारागीर तरुण उद्योजक अजय जोशींच्या रूपाने खान्देशात नावलौकिकास पात्र ठरत आहे. माझी कला बहरत असतांना माझ्या नेत्याची शाबासकी ची थाप माझेवर पाठीवर पडावी यासाठी मनात आसुसुता धरून ठेवणाऱ्या अजय भाऊंची आज इच्छा पूर्ण झाली. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज रात्री अकरा वाजता अजय भाऊंनी बनविलेल्या आकर्षक आणि इतिहासाची साक्ष देणारा तोफ गाड्या ची पाहणी केली अन अजय जोशींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. मात्र यावेळी अजय भाऊंन्नी आपल्या मनातील आनंदाश्रुंना मोकळी वाट करून दिली. दादा माझी कला समोर आहे.आणि आर्थिक पाठबळाची आकांक्षा मनात घर करून आहे. दादासाहेब याहून देखील अधिकाधिक सुंदर कलाकृती बनवून जगासमोर ठेवतो मात्र यासाठी भांडवलाची गरज आहे. असे सांगताना आपल्या अश्रूंचा बांध फुटला . खासदार उन्मेश दादा पाटील यांनी त्यांच्या खासदार मित्रांशी संपर्क साधला आणि अजय जोशींनी तयार केलेले तोफगाडे गाड्यांना दिल्लीतील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची हमी अजय भाऊंना दिली.आणि दहा लाख रुपयांची बँकेतून आर्थिक योजना घडवून देतो.असे सांगितले यावेळी *अजय भाऊंच्या डोळ्यांतील दुखाश्रुचे परिवर्तन आनंदाश्रू मध्ये झाले.* यावेळी अजय जोशींच्या कलाकृती पाहण्यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील, सामाजिक कार्यकर्ते उदय दादा पवार, लोकसभा मतदार संघाचे काकाश्री नरेंद्र जैन, युवा उद्योजक समकित छाजेड, स्माईल इंडिया टुरिझम चे सचिन पवार, विनायक पाटील, लोंजे ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण उपस्थित होते. *खासदार उन्मेश दादा यांनी कलाप्रेमी खासदारांपर्यंत आपली कलाकृती पोहचवतो अशी शाबासकी अजय जोशींना दिली.अज्जू दादांनी खासदार उन्मेश दादांचे आभार मानले.*






