महाराष्ट्र मराठी 7 चा दणका…
बांधकाम व्यावसायिक सरजूशेठ गोकलानी यांना अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांनी बजावली दंडाची नोटीस
अमळनेर
येथील गट क्र 1313 या संदर्भात बांधकाम व्यावसायिक सरजूशेठ गोकलानी यांनी अवैध गौण खनिज साठा करून ठेवल्याची बातमी महाराष्ट्र मराठी 7 ने प्रकाशित केली होती.सातत्याने ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता. तसेच या बांधकाम व्यावसायिकानीं अवैध गौण खनिज मध्ये वाळू, मुरूम,पिवळी माती,डबर इ चा अवैध व बेकायदेशीर साठा करून ठेवला होता.यात अंदाजे 40 ब्रास वाळू,222 ब्रास मुरूम,800 ब्रास पिवळी माती साठा करून ठेवला होता. त्यानुसार अमळनेर उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या पथका सोबत गट क्र 1313 रवी नगर येथे भेट देऊन पंचनामा केला व खुलासा सादर करण्यास बांधकाम व्यावसायिक यास सांगितले होते.त्यांनी दिलेले पुरावे फेटाळून पाच पट दंड आकारण्यात आला आहे.
यानुसार वाळूचे 7,69,000/-रु ,मुरूमचे 8,88,000/- रु, तर पिवळ्या मातीचे 24,00,000/-असे एकूण चाळीस लाख सत्तावन हजार रु दंड पोटी भरण्याचे आदेश दिले आहेत.
या कार्यवाही मुळे गौण खनिज चोरटे व साठा करणाऱ्या ना चांगलाच चोप बसणार आहे. तसेच त्यांचे धाबे दणाणले आहे.या कार्यवाही मुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.






