?️ अमळनेर कट्टा… अमळनेरच्या भुषण भदाणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणुन नियुक्ती.
अमळनेर : आमदार अनिल भाईदास पाटिल यांचे कट्टर समर्थक भुषण भदाणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीवर प्रदेश सचिव म्हणुन गुरुवारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी नियुक्ती जाहिर केली.
आमदार अनिल भाईदास पाटिल व माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी कॉंग्रेस जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तसेच पार्थ अजित पवार यांच्या नेतृत्वात व पार्थ पवार मित्र परिवार महाराष्ट्राचे अध्यक्ष आकाश झाबरे पाटिल यांच्या सहकार्याने सदर नियुक्ती जाहीर करण्यात आली.
आमदार अनिल पाटिल यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ता म्हणुन भुषण भदाणे यांची ओळख आहे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्यांनी महत्वाची जबाबदारी यशस्वी केली होती तसेच वेळोवेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थी हितासाठी त्यांनी आजवर मोठ मोठे आंदोलन केली आहे. अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथील शिक्षक संजय काशिनाथ भदाने यांचे चिरंजिव असलेल्या भुषण भदाने यांच्या नियुक्तीमुळे त्याच्यावर सर्व सामजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







