IndapurPune

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात इंदापूर तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन..

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात इंदापूर तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन..

हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका एकवटला

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे – शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, महिलांच्या वर होणारे अत्याचार थांबले पाहिजे,इत्यादि मागण्या करीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाने इंदापूर तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन केले.

या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सरकार वर घणाघाती टीका केली,आघाडी सरकार हे निष्क्रिय आहे,घोषणा करणारे,दगाबाजी करून सत्तेवर आलेले सरकार आहे,शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करू म्हणणारे आज कुठे गेले असे मत माजी मंत्री पाटील यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात इंदापूर तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन..

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी हर्षवर्धन पाटील केली. या वेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ऋतुजा ताई पाटील यांनी सांगितले की आज मुली घराबाहेर पडताना सुरक्षित नाहीत ,कायद्याच्या धाक राहिला नाही, त्या मुळे हिंगटघाट सारखी घटना घडली.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की इंदापूर तालुक्यात फक्त १६७२५ शेतकरी पात्र ठरले आहेत,पुणे जिल्ह्यातील फक्त दोन गाव या कर्जमाफी मध्ये बसले आहेत, त्या मुळे नियमित कर्ज भरलेला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, नाहीतर भविष्यात कोणी कर्ज भरणार नाहीत.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आप्पासाहेब जगदाळे, तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे,नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार,सभापती पुष्पा रेडके,माजी सभापती मयूरशिह पाटील,व्हा चेअरमन कांतीलाल झगडे,इंदापूर अर्बन सहकारी बँक चेअरमन भरत शहा,माऊली चवरे,बाबासाहेब चवरे,कृष्णाजी यादव,मंगेश पाटील,विलासराव वाघमोडे, अशोक वणवे,विकास पाटील,तानाजी थोरात,शेखर पाटील,संग्रामसिंह निंबाळकर,रमेश खारतोडे आदी उपस्थित होते.या वेळी तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले

सूत्रसंचालन नगरसेवक कैलास कदम यांनी केले आभार शहर अध्यक्ष शकीलभाई सयद यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button