गांधी’ हे उधार आडनाव लावणाऱ्या राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करू नये
हिंदू जनजागूती समितीचे प्रवक्ता रमेश शिंदे यांची माहीती
कोल्हापूर ःप्रतिनिधी आनिल पाटील
मुंबई येथे १५ डिसेंबर या दिवशी प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेधाचा ठराव पारीत केला गेला, हिंदुत्वनिष्ठांनी निषेधाचा ठराव पारीत करत उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या. यावेळी ठराव पारीत करताना उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना संबोधित करताना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे म्हणाले, ” राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो अवमान केला त्याचा या अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समिती, अधिवेशनाला उपस्थित सर्व राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ राहुल गांधींचा निषेध करत आहोत.”
यावेळी विषय मांडताना श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, “राहुल गांधी नुकतेच केलेल्या वक्त्यव्यात ते म्हणाले, माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. बरं झालं की राहूल गांधी यांच्या नावात ‘सावरकर’ नाही. कारण सावरकर नावात ‘वीरता’ आहे, म्हणून त्यांना ‘वीर सावरकर’ म्हटले आहे. राहुल गांधी यांनी अतिशय जबाबदारीने सांगावे की, ते जे ‘गांधी’ आडनाव स्वतःला लावतात ते कितपत उधारीवर घेतले आहे. ‘गांधी’ हे उधार आडनाव लावणाऱ्या राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करू नये. हिंदू धर्मात विवाहानंतर पत्नीचे आडनाव बदलते. प्रियांका गांधी यांचे नाव मात्र ‘वाड्रा’ झाले नाही ते गांधीच राहिले. सर्वप्रथम त्यांनी आपले ‘गांधी’ हे खोटे आडनाव लावणे बंद करून खरे आडनाव लावण्यास प्रारंभ करावा. सावरकरांनी वैयक्तिक सुटकेसाठी ‘क्लेमेंन्सी पिटिशन’ नव्हे तर कैदेतील सर्व राजबंद्याच्या सुटकेसाठी ‘अॅम्नेस्टी पिटिशन’ दाखल केले होते. राहुल गांधीनी हे लक्षात घ्यावे. गतवर्षी पंतप्रधानांना उद्देशून केलेल्या ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्यावर स्वःताची अटक रोखण्यासाठी राहूल यांनी न्यायालयात ‘विनाअट माफी’ मागीतली होती. फार कष्ट घेऊन सावरकर बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र ती पदवी घेण्यासाठी आपली ब्रिटिश राज्यव्यवस्थेशी निष्ठा असल्याचे मान्य करावे लाखत असे. हे कळल्यावर सावरकरांनी बॅरिस्टरची पदवी घेतली नाही. मात्र राहुल गांधींचे आजोबा जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश राज्यव्यवस्थेशी निष्ठा मान्य करून ते बॅरिस्टर झाले. त्यामुळे राहुल गांधीनी यांचे चिंतन केले पाहिजे.”
या अधिवेशनात झालेल्या विविध उद्बोधन सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. भारत सेवाश्रम संघाचे प्रचारक स्वामी सौरभानंद महाराज उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “आपला हिंदू धर्म प्राचीन असल्याने प्रचार -प्रसार करण्याची काय आवश्यकता ? असा अतिआत्मविश्वास हिंदूंमध्ये निर्माण झाला आहे. अशा प्रवृत्तीमुळे आपला समाज, संस्कृती वाचू शकत नाही. यासाठी सर्व संघटनांनी जागृत होऊन संघटितपणे कार्य केले पाहिजे”. ‘लष्कर ए हिंद’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल आपला विषय मांडताना म्हणाले की, “कोणीही उठसूट येऊन हिंदू धर्माच्या विरोधात बोलत आहे. मंदिरे तोडली जात आहेत. याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता असून हिंदु सहिष्णू असल्याने हे होत आहे. यासाठी जो पर्यंत भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केले जात नाही तो पर्यंत आपण सुरक्षित राहू शकत नाही”. या प्रसंगी न्याय (पालिका) व्यवस्थेतील भ्रष्टाचार याविषयावर बोलतांना सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुभाष झा म्हणाले, की, “सध्याच्या काळात एखाद्या न्यायाधीशाने भ्रष्टाचार केला, तर केला, त्यात काय, अशी स्थिती आहे. यात पालट होण्याची आवश्यकता आहे. चाणक्यांच्या काळात एखाद्या न्यायाधीशाने भ्रष्टाचार केला तर त्यांना कठोर शिक्षा केली जात होती.”
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या दोन दिवसीय प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील अधिवक्ता, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते, विविध संप्रदाय, मंडळे यांचे प्रतिनिधी यांसह एकूण ५० संघटनांचे १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या अधिवेशनात या अधिवेशनात मंदिरात शासनाचे नियंत्रण असणे योग्य आहे का ? या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. ‘राष्ट्र व धर्मकार्य करत असताना ‘माहिती व अधिकार’ याचा कसा प्रभावीपणे वापर करावा ?’, ‘हिंदु राष्ट्राच्या संदर्भात जागृती करण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम आयोजित करावेत ?’, या समवेतच ‘धर्मकार्य करतांना साधनेचे अधिष्ठान ठेवण्याचे महत्त्व’ आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या अधिवेशनातील गटचर्चेत धर्मप्रेमींनी धर्मकार्य करतांना येणार्या समस्या मोकळेपणाने मांडल्या. त्यावर कोणत्या उपाययोजना आखायला हव्यात, यांविषयीही अवगत करण्यात आले. अधिवेशनाच्या सांगता समारोपात उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’चा गजर करत लोककल्याणकारी हिंदु राष्ट्रासाठी झोकून देऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.






