Kolhapur

मुश्रीफांच्या विजयासाठी गडहिंग्लजकर एकवटले

मुश्रीफांच्या विजयासाठी गडहिंग्लजकर एकवटले

गडहिंग्लज शहरातील कार्यकर्त्यांची निघाली विराट पदयात्रा

कोल्हापुर प्रतिनिधि: अनिल पाटील:

आमदार हसन मुश्रीफ यांच्या सलग पाचव्या विजयासाठी गडहिंग्लजकर एकवटले आहेत. आज गुरुवार दि. 11 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित महासंघ, आरपीआय गवई गट आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य मार्गांवरून पदयात्रा काढली. या पदयात्रेत या प्रमुख कार्यकर्त्यांसह तीन हजारावराहून अधिक नागरिक सहभागी झाले.

सकाळी नऊ वाजता नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी यांच्या हस्ते या पदयात्रेचा शुभारंभ झाला. त्यानंतर ग्रामदैवत श्री. लक्ष्मी देवीचे दर्शन व शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा पुढे मुख्य रस्त्यावरून दसरा चौकातील अश्वारुढ श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आली, येथेही मान्यवरांनी पुतळ्याला अभिवादन केले.

या पदयात्रेत नगराध्यक्ष सौ. स्वाती कोरी, किसनराव कुराडे, उपनगराध्यक्ष सौ. सुनिता पाटील, अबिद मुश्रीफ, उदय जोशी, माजी नगराध्यक्ष सौ. लक्ष्मी घुगरी, माजी नगराध्यक्षा सौ. कावेरी चौगुले, राजशेखर येरटी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, माजी नगराध्यक्ष राजन पेडणेकर, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, प्रा. जे. बी. बारदेस्कर, राजेश बोरगावे, सागर हिरेमठ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, दिग्विजय कुराडे, नगरसेविका क्रांतीदेवी शिवणे, नगरसेविका नाझ खलीफ, नगरसेवक उदय पाटील, सुरेश कोळकी, रामगोंडा पाटील, प्रकाश कांबळे,सौ. शर्मिली पोतदार, नगरसेवक हरुण सय्यद, नगरसेविका रेश्मा कांबळे आदी प्रमुख मान्यवरांसह नगरसेवक आजी-माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ झालेल्या सभेत

*नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी म्हणाल्या, आमदार हसन मुश्रीफ म्हणजे आमच्या हक्काचा आमदार…..*
*यापूर्वी कुठेही प्रशासनात काम घेऊन गेलो की आम्ही सांगायचो, आमचा कोणी आमदार नाही, आमचा कोणी खासदार नाही, परंतु यापुढे अभिमानाने आणि ताठ मानेने सांगत राहू कि हसन मुश्रीफ आमच्या हक्काचा आमदार आहेत. गोरगरीब, कष्टकरी कामगार यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यासाठीच आम्ही आमदार हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे असे त्या म्हणाल्या.*

अबिद मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहराचा वाढता पाठिंबा पाहता, या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ ऐतिहासिक मताधिक्‍याने विजयी होतील, असा विश्वास वाटतो .

माजी नगराध्यक्षा सौ. मंजूषा कदम म्हणाल्या, आमदार हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी आम्ही गडहिंग्लजकर जिवाच रान करू.

माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी घुगरी म्हणाल्या, आमदार हसन मुश्रीफ यांनी शहराची प्रलंबित हद्दवाढ करून गडहिंग्लज या व्यापक आणि विस्तारित विकासाला चालना दिली आहे.

********************
फोटो ओळी-
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातून आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ निघालेली ही पदयात्रा

छायाचित्र- संदीप तारळे, गलगले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button