पंढरपूर

स्वेरीच्या ऋषिकेश साबळे यांची चंदगड नगरपालिकेत नगर अभियंतापदी नियुक्ती

स्वेरीच्या ऋषिकेश साबळे यांची चंदगड नगरपालिकेत नगर अभियंतापदी नियुक्ती*

रफिक अतार

पंढरपूर- येथील संभाजी चौक येथील रहिवासी असलेले ऋषिकेश ज्योतीराम साबळे यांनी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून उज्वल यश संपादन केले असून त्यांची चंदगड (जि. कोल्हापूर) मधील नगरपालिकेत नगर अभियंता म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
ऋषिकेश यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण नाथ चौक येथील कवठेकर हायस्कूलमधून तर बारावी सायन्स विभागातून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून झाले आहे. त्यानंतर स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरींग विभागातून पदवी संपादित केली. पदवी पर्यंतचे शिक्षण घेत असतानाच स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. एम. एम. पवार यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. २०१५ साली स्वेरीतून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात ऋषिकेश यांनी यश संपादन केले. आज ऋषिकेश यांची नियुक्ती चंदगड नगरपालिकेत ‘नगर अभियंता’ म्हणून झाली आहे. यशाचे संपूर्ण श्रेय ते स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सरांना देतात. त्यांचे वडील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात टेलिफोन ऑपरेटर आहेत तर आई गृहिणी आहे. स्वेरीतील शिस्तीमुळे त्यांना अभ्यासाची सवय लागली. स्वेरीत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते याचा ही प्रचंड फायदा झाला. यातूनच हे यश मिळाल्याचे ऋषिकेश आवर्जून सांगतात. स्पर्धा परीक्षेत मिळालेल्या यशामुळे ऋषिकेश यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रचंड मेहनत, जिद्द व योग्य मार्गदर्शन यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा स्वेरीचे संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबद्धल संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
छायाचित्र –स्वेरीतून उत्तीर्ण झालेले ऋषिकेश ज्योतीराम साबळे यांची स्पर्धा परीक्षेतून चंदगड मधील नगरपालिकेत नगर अभियंता म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्वेरीचे संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत डावीकडून प्रा. दिग्विजय रोंगे, अक्षय मोरे व स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button