Amalner

आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे मतदार संघातील 80 दिव्यांग बांधवाना मोफत ट्रीसायकल आणि कमी ऐकू येत असणाऱ्यांना मोफत श्रवणयंत्र वाटप…गोर गरीब, आदिवासी, दिव्यांग यांच्या समस्यांची जाणीव असणारा दमदार आमदार..

आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे मतदार संघातील 80 दिव्यांग बांधवाना मोफत ट्रीसायकल आणि कमी ऐकू येत असणाऱ्यांना मोफत श्रवणयंत्र वाटप…गोर गरीब, आदिवासी, दिव्यांग यांच्या समस्यांची जाणीव असणारा दमदार आमदार…

आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे मतदार संघातील 80 दिव्यांग बांधवाना मोफत ट्रीसायकल आणि कमी ऐकू येत असणाऱ्यांना मोफत श्रवणयंत्र वाटप...गोर गरीब, आदिवासी, दिव्यांग यांच्या समस्यांची जाणीव असणारा दमदार आमदार..

अमळनेर
समस्त दिव्यांग बांधव या समाजाचे घटक असून कोणत्याही बाबतीत ते मागे राहू नयेत ही आपली प्रामाणिक धारणा आहे,त्यांच्या जीवनास गती मिळावी यासाठीच मानवतेच्या दृष्टीकोनातून ट्रीसायकल आणि श्रवणयंत्र वाटप केली असून अजून कोणी दिव्यांग बांधव वंचित असतील त्यांना कार्यालयात नावे नोंदवावीत असे विनम्र आवाहन आ.शिरीष चौधरीं यांनी केले.
           आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे मतदार संघातील 80 दिव्यांग बांधवाना मोफत ट्रीसायकल आणि कमी ऐकू येत असणाऱ्यांना मोफत श्रवणयंत्र वाटपाचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात नुकताच पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे अध्यक्ष डॉ नितीन शिवाजीराव पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून वेलनेस अम्बेसेडर डॉ रेखा चौधरी,सौ अनिता चौधरी,महिला बालकल्याण व अपंग पुर्नवसन विकास महामंडळचे दिनेश ठाकरे, गटनेते प्रवीण पाठक, श्रीराम चौधरी, पांडुरंग महाजन, डॉ निखिल बहुगणे, डॉ प्रकाश ताळे, डॉ भूषण पाटील, डॉ मिलिंद नवसरीकर, डॉ शरद बाविस्कर, डॉ किरण बडगुजर, डॉ श्यामकांत नेरकर, डॉ विलास महाजन, नगरसेविका कल्पना चौधरी, ज्योती महाजन, नगरसेवक सलीम शेख, श्याम पाटील, महेश जाधव, किरण बागुल, संतोष लोहरे, सुनील भामरे, अविनाश जाधव, गौरव चौधरी, प्रा राजेंद्र महाजन,आबु महाजन, बिरजू चौधरी, गुलाम नबी, सुदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, रमेश पाटील, हिरामण पाटील, राजेंद्र पाटील, सोपान लोहार  या प्रसंगी उपस्थित होते.आ.शिरीष चौधरी यांनी पुढे बोलताना हात पाय गमावलेल्या दिव्यांग बांधवांसाठी देखील योगदान देण्याची तयारी दर्शवून त्यांच्यासाठी मोफत जयपुरी पद्धतीचे कुत्रीम अवयव बसविले जातील असे जाहीर केले.

आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे मतदार संघातील 80 दिव्यांग बांधवाना मोफत ट्रीसायकल आणि कमी ऐकू येत असणाऱ्यांना मोफत श्रवणयंत्र वाटप...गोर गरीब, आदिवासी, दिव्यांग यांच्या समस्यांची जाणीव असणारा दमदार आमदार..

शिरीष दादांचे काम समाधानकारक-डॉ नितीन पाटील
           आयएमए अमळनेर चे अध्यक्ष डॉ नितीन पाटील म्हणाले की आ.चौधरींच्या विकास कामांनी जनता समाधानी असून त्यांचे कार्य खूप सूंदर आहे, तालुक्यातील 75 टक्के विकासकामे या चौधरी परिवाराने करून टाकली आहेत असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
अपंग बांधवांप्रती तळमळ असणारे आमदार
        अपंग बांधव प्रसाद कापडे आपल्या मनोगतात म्हणाले की गेल्या 36 वर्षाच्या काळात अपंगांना सायंकलरूपी भेट देणारे आमदार चौधरी पाहिला पहिलेच आमदार असून अपंगांचे पगार सुद्धा प्राधान्याने ते मंजूर करत असतात, प्रत्येक दिव्यांग बांधवाला सर्व प्रकारचा लाभ मिळावा हीच त्यांची तळमळ असते,यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना खंबिर साथ देऊन त्यांच्या प्रेमा इतकाच मतांचा पाऊस देखील पाडू असा संकल्प त्यांनी जाहीर केला.
          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव तसेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button