Aurangabad

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये खैरे विरुद्ध जलील

गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आता व्यापारी, व्यवसायिकांसाठी अन्यायकारक ठरणारे लॉकडाऊन हटविण्यात यावे.
राज्य शासनाने तातडीने यावर निर्णय घ्यावा, नसता येत्या १ जूनला जिल्ह्याचा खासदार म्हणून आपण स्वत: दुकाने उघडण्यास सुरूवात करणार, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य शासनाला दिला.
तर दुसरीकडे इम्तियाज जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करत आहेत. ते जर दुकानं उघडायला आले तर त्यांना शिवसैनिक उत्तर देतील असा इशारा देत, लॉकडाऊन जर उघडलं तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे.
त्यामुळे प्रशासनानं इम्तियाज जलील यांच्यावर तातडीनं कारवाई करावी”, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये खैरे विरुद्ध जलील वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button