Pune

CAA, NRC विरोधात वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद

CAA, NRC विरोधात वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

CAA, NRC आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये सुमारे २५ ते ३० संघटना सहभागी होतील असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

CAA, NRC विरोधात वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाददेशात NRC आणि CAA विरोधात प्रचंड रोष आहे. अनेक राज्यांमध्ये यावरुन आंदोलनं आणि जाळपोळही झाली. सरकारने हा कायदा लागू केला आहे यामागे त्यांची दडपशाही आहे. एकीकडे या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे त्यामुळेच आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

नोटबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे केंद्र सरकाविरोधात निषेधाचं वातावरण तयार झालं. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही बंदचं आवाहन केलं आहे. आमच्या बंदमध्ये २५ ते ३० संघटना सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास आहे असं प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

आज NRC,CAA कायद्याच्या विरोधात वंचित बहुजनआघाडीच्या वतीने इंदापूर बंदचे
आवाहन केले होते.बंदला इंदापूर शहरातील सर्व
व्यापारी, हातगाडेवाले, सर्व हॉटेल्स, गाळेधारक, किरकोळ विक्रेते या सर्वांनी आपले व्यवसाय कडकडीत बंद ठेवून बंद १००% यशस्वी केले.समस्त नागरीक, विविध पक्षाचे
कार्यकर्ते यात सहभागी झाले होते इंदापूर
पोलीस स्टेशन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोणी देवकर या गावात 100% बंद पाळण्यात आला सम्यक विद्यार्थि आंदोलन पुणे जिल्हा सदस्य पवन राजु पवार यांच्या अध्यक्ष ते खाली प्रसाद हरिदास लोखंडे तालुका सचिव, सागर गौतम गायकवाड,विकास दत्तात्रेय गायकवाड, आविनाश विनायक गायकवाड
दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button