चांपा येथे जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न
अनिल पवार
चांपा , ता 8:जागतिक महिला दिनानिमित्त रेड स्वस्तिक सोसायटी व गट ग्रामपंचायत चांपा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त उमरेड तालुक्यातील चांपा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले .या प्रसंगी महिलांना समसमान हक्क , न्याय मिळून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षात महिलांनी मोठा लढा दिला त्यामुळे आज आपण स्त्रियांना विविध क्षेत्रात प्रगतीपथावर पहातो .तसंच महिलांची सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , राजकीय अशा विविध स्तरावरील प्रगतीचा व याहीपेक्षा ग्रामीण भागात कष्टाचं आयुष्य जगून संसाराला खंबीर साथ देणाऱ्या मातृशक्तीचाही सत्कार रेड स्वस्तिक सोसायटी व ग्रामपंचायततर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेड स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ .मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत चांप्याचे सरपंच
अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या स्तनांचा कँसर, नेत्र तपासणी , दंतरोग तपासणी , जनरल तपासणी , ब्लड शुगर तपासणी , ब्लड प्रेशर, मोतीयाबिंदू तपासणी करिता एकूण 287 रुग्णाची मोफत तपासणी करून विविध तपासणी व विशेष म्हणजे महिलांना होणाऱ्या रोगावर मार्गदर्शन करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एनआरबिएम चे संचालक यूपकुमार पंचबुद्दे , रोहित दादा माडेवार , नेहरू युवा केंद्राच्या तालुका समन्वयक प्रियांका लोहबरे , चांपा तलाठी प्रियांका आलोने उपस्थित होते .
प्रमुख उपस्थितीत डॉ अरुण दोनडूलकर.डॉ यश अग्रवाल , डॉ खलीन खालसा , डॉ वैदही नाईक , डॉ .रोशनी चामट , यांनी आपले अमूल्य सेवा दिली .याप्रसंगी एनआरबिएमचे विद्यार्थी , तनिष्का महिला गट , ग्रामपंचायतचे उपसरपंच अर्चना सिरसाम , ग्रा प सदस्या मिराबाई मसराम , ग्रामसेवक बि बि वैद्य , आरोग्य सेविका अलका घरडे , एकता महिला ग्रामसंघ व महिला मंडळच्या अध्यक्षा शिल्पा राले , अंगणवाडी सेविका शीला अडकणे , तंटामुक्त अध्यक्ष वैशाली वरठी , तनिष्का गट प्रमुख ,आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता परिश्रम घेतले .
*चांपा येथे महिला शिलाई प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन*
रेड स्वस्तिक सोसायटी द्वारे चांपा ग्रामपंचायतला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिलाई प्रशिक्षण केंद्राला पाच शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या , महिला शिलाई प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रेड स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ .मिलिंद नाईक यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडला .






