Nashik

खडकसुकेणे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला, शिवसेना ० तर राष्ट्रवादी ९ जागांवर विजयी

खडकसुकेणे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला, शिवसेना ० तर राष्ट्रवादी ९ जागांवर विजयी

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणा येथील ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची झाली. शिवसेनेचे दिंडोरी-पेठ विधानसभा संपर्कप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या सत्तेला सुरुंग लावत परीवर्तन पॅनलच्या माध्यमातून सर्वच्या सर्व ९ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खडकसुकेणा ग्रामपंचायतीवर फडकला आहे.
खडकसुकेणे येथे एकूण नऊ जागांसाठी क्रांती व परिवर्तन पॅनल मध्ये सरळ लढत होती. या लढतींमध्ये परिवर्तन पॅनेलने सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आल्याने प्रस्थापित क्रांती पॅनलला धक्का बसला आहे. यात वार्ड क्रमांक १ मध्ये गुंबाडे बापू रामदास,गवळी द्वारकाबाई बाळू, गणोरे मुक्ता पुरुषोत्तम, वार्ड क्रमांक २ मध्ये गांगुर्डे विजय शांताराम , फुगट मधुकर काशिनाथ, वाघ सुनिता विजय तर वार्ड क्रमांक 3 मध्ये पालखेडे रमेश दामू, गुंबाडे रंजना शिवाजी, पालखेडे सुरेखा नारायण हे परिवर्तन पॅनलचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे खडक सुकेने गावांमध्ये उत्साहात स्वागत करून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष व्यक्त केला व खडक सुकेने ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत आनंद साजरा केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button