Khirdi

खिर्डी ते बलवाडी रस्ता झाला जीवघेणा….

खिर्डी ते बलवाडी रस्ता झाला जीवघेणा….

खिर्डी भीमराव कोचुरे

रावेर तालुक्यातील खिर्डी ते बलवाडी पाच किलोमीटर अंतर चा रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने शेतकरी व गावकरी हे दररोज येजा करतात हा रस्ता वाहतुकी साठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने काही महिन्यांपासून हा रस्ता खड्डे मय झाला आहे परंतु अजूनही या रस्त्याची साधी डागडुजी सुध्दा करण्यात आली नाही.पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्याने प्रवास करणे अक्षरशः धोकदायक असून याची जाण सार्वजनिक बांधकाम विभागाला असून सुध्दा या रस्त्याला न्याय देण्या करिता विलंब होत असल्याने .आजू बाजू च्या परीसरतील नागरिक त्रस्त झाले आहे.रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहे हेच कळत नाही. खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. खड्डे वाचविण्याचा नादात अनेक वेळा छोटे मोठे अपघात नेहमी घडत असतात. या अपघातांमुळे अनेक लोकांना गंभीर दुखापत सुध्दा झाल्या आहेत.त्याच प्रमाणे या खड्ड्यामुळे पाठ दुखी व मणक्यांच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. खड्डे आता जीवघेणे ठरत असल्याने .जनमानसात रोष व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button