Khirdi

निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये नवरात्री उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग संपन्न

निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये नवरात्री उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग संपन्न

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नवदुर्गा मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची दि.०६. बुधवार रोजी सायंकाळी निंभोरा पोलीस स्टेशनला मिटिंग आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात दि.०७/१०/२०२१ ते १६/१०/२०२१. रोजी श्री. दुर्गा नवरात्री उत्सव सण साजरा होणार असून दि.०६/१०/२०२१. रोजी निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची पोलीस स्टेशनला बैठक घेऊन त्यांना शासन परिपत्रकाप्रमाणे मार्गदर्शन करून त्या प्रमाणे कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.व त्या नंतर निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील परवानगी घेतलेल्या ४७ सार्वजनिक व २३ खाजगी अशा एकूण ७० श्री. दुर्गा मंडळ पदाअधिकाऱ्यांची निंभोरा पोलीस स्टेशनच्या आवारात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या अध्यक्षतेखाली, बैठक घेण्यात येऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मा. राज्य शासनाकडून तसेच मा. जिल्हा अधिकारी साहेब जळगांव यांचे कडून आलेल्या परिपत्रकाचे वाचन करून त्यांना सदरच्या सूचना समजावून सांगून सूचनानंप्रमाणे श्री. दुर्गा उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत सूचना करण्यात आल्या .सदर वेळी श्री. दुर्गा मंडळाच्या अडीअडचणी समजावून त्यावर देखील उपाय योजना करण्याबाबत आश्वाशीत करण्यात आले . श्री.दुर्गा मंडळानी मा. शासनाच्या नियमावली नुसार कोरोना अनुषंगाने सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट मूर्ती तसेच खाजगी मंडळा करिता २ फूट मूर्ती स्थापन करावे.स्थापना व विसर्जन मिरवणूका काढू नये. याबाबत सूचना दिल्या. सदर बैठकीस सर्व सार्वजनिक व खाजगी मिळून ७० मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी उपस्थिती दिली. तदनंतर निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांना परवाना वाटप करण्यात आले. सदर बैठकीचे सूत्र संचालन ना.पो.कॉ. स्वप्नील पाटील यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पो.हे.कॉ. राकेश वराडे, गणेश सूर्यवंशी, तसेच होमगार्ड यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button