महिला आठवडा बाजार वाढता प्रतिसाद आता दर सोमवारी सकाळी भरणार महिला आठवडा बाजार
नूर खान
*”शेतीला पाणी हाताला काम”*
शिकलेली आई घरा-दाराला पुढे नेई – या म्हणी प्रमाणे आपणास असे म्हणता येईल की, आर्थिक दृष्ट्या महिला सक्षमीकरण झाली तर, कौटुंबिक आर्थिक अडी – अडचणींना सामोरे जाण्यासाठी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या खांद्याला – खांदा लावून मदतीचा हात पुढे करेल.

२१ व्या शतकात महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करुन म्हणजे सक्षमीकरण /सबलीकरणासाठी हि काळाची गरज आहे. त्या साठी मा. आ. श्री शिरीषदादा चौधरी अमळनेर यांनी मतदार संघात *”शेतीला पाणी आणि हाताला काम “* या युक्ती प्रमाणे *“आठवडा बाजार “* ह्या संकल्पनेतून महिलांनी ‘महिला बचत गटांनी’ तयार केलेल्या विविध वस्तू आणि खादय पदार्थ दैनंदिन गरजा भागविण्याचा गरजेचे वस्तु अशा अनेकविध वस्तुसाठी मार्केटिंग, तसेच विक्री व मार्गदर्शन मि व झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ रेखाताई चौधरी यांच्या मदतीने अमळनेर शहरातच नव्हे तर विविध जिल्हाच्या व मोठे शहरांमध्ये जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये मोठा बाजार पेठ उपलब्ध करुन भविष्यात स्पेशल शॉपिंग मॉल उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करु व महिला सक्षमीकरणासाठी व सबलीकरणासाठी विशेष लक्ष देवू.







